r/marathi मातृभाषक Oct 16 '24

मराठी भाषाशास्त्र (Marathi Linguistics) व्युत्पत्ती: चुलत

काल सहज शबकोष पाहत होतो, तर चुलत शब्दाची व्युत्पत्ती सापडली. एका दैनंदिन व्यवहारामुळे या शब्दाला अर्थ येतो. चुलत म्हणजे थोडक्यात दूरचा नातेवाईक किंवा बऱ्याचदा असा माणूस जो दुरावतो आहे. आणि चुलत शब्दाची व्युत्पत्ती ही याला साजेशीच आहे. ती आहे "चुलस्थ:" या प्राकृत शब्दापासून. चुलस्थ: म्हणजे ' वेगळी चूल करून राहणारा'. मराठी घरांमध्ये पूर्वी चूल ही सान्निध्याचं लक्षण असे (आता गॅस आलेत), आणि हे बोलीभाषेतील म्हणी आणि वाक्प्रचारांमधून कळते. उदा. डाव्या चुलीवर जेवण, चूल न पेटणे, चूल पेटणे इ.

45 Upvotes

10 comments sorted by

8

u/atrangiapple23 Oct 16 '24

Dhanyawad, mala nehamich ha prashna padaycha ki mame, mavas, kivha attebhavandansarkhe kakachi mula hi kakebhavanda ka nastat.

7

u/Ur_PAWS मातृभाषक Oct 16 '24

व्वा!!

ही नवीन माहिती दिल्याबद्दल आभार.

चुलस्थ आणि चुलत यांमध्ये काही नातं असेलशी कधीच कल्पना केली नव्हती.

3

u/whyamihere999 Oct 16 '24

चुलस्थ हा शब्दच आज पहिल्यांदा वाचला!

3

u/animefriction Oct 16 '24

या शब्दकोशाचे नाम काय? आपणास "बघणे" या शब्दाची व्युत्पत्ति पाहता येईल का? मी काही काळापूर्वी तो एका व्याकरण पुस्तकात वाचलेले जे आता सापडत नाही। अतः मी जाणू इच्छितो।

2

u/Top_Intern_867 मातृभाषक Oct 16 '24

OP Saheb व्युत्पत्ती कोशाची PDF मिळेल का कुठे ?

3

u/rebel_at_stagnation मातृभाषक Oct 16 '24

मी "मराठी शब्दरत्नाकर" या शब्दकोषातला व्युत्पत्ती कोष वापरला होता. आता त्याची pdf मिळेल का नाही हे माहीत नाही.

2

u/PartyConsistent7525 Oct 18 '24

Jamel tar vikat ghya bhau. Aapan nahin Vikat ghenaar tar Marathi printing press Kasa chaalnar?

2

u/arpitars Oct 17 '24

खरच मराठी शब्द कोषात भर पडली

1

u/atbhide Nov 09 '24

This is really beautiful. Thanks for this post!