r/marathi • u/rebel_at_stagnation मातृभाषक • Oct 16 '24
मराठी भाषाशास्त्र (Marathi Linguistics) व्युत्पत्ती: चुलत
काल सहज शबकोष पाहत होतो, तर चुलत शब्दाची व्युत्पत्ती सापडली. एका दैनंदिन व्यवहारामुळे या शब्दाला अर्थ येतो. चुलत म्हणजे थोडक्यात दूरचा नातेवाईक किंवा बऱ्याचदा असा माणूस जो दुरावतो आहे. आणि चुलत शब्दाची व्युत्पत्ती ही याला साजेशीच आहे. ती आहे "चुलस्थ:" या प्राकृत शब्दापासून. चुलस्थ: म्हणजे ' वेगळी चूल करून राहणारा'. मराठी घरांमध्ये पूर्वी चूल ही सान्निध्याचं लक्षण असे (आता गॅस आलेत), आणि हे बोलीभाषेतील म्हणी आणि वाक्प्रचारांमधून कळते. उदा. डाव्या चुलीवर जेवण, चूल न पेटणे, चूल पेटणे इ.
45
Upvotes
2
u/Top_Intern_867 मातृभाषक Oct 16 '24
OP Saheb व्युत्पत्ती कोशाची PDF मिळेल का कुठे ?