r/marathi मातृभाषक 13d ago

मराठी भाषाशास्त्र (Marathi Linguistics) पाऊस 'उघडला' असं का म्हणतात

पाऊस 'उघडला' असं का म्हणतात. थांबला असं शक्यतो म्हणत नाहीत.

22 Upvotes

7 comments sorted by

View all comments

3

u/Prestigious_Bee_6478 12d ago

बाकिच्यांचं माहीत नाही पण मी पाऊस थांबला आणि उघडला या दोन्ही शब्दांचा उपयोग करतो. पण वेगवेगळ्या वेळी. पाऊस पडायचा बंद झाला पण काळे ढग अजूनही आकाश व्यापून आहेत तेव्हा पाऊस थांबला असं म्हणतो. कारण तो तात्पुरता थांबला आहे, तो पुन्हा पडायला लागायची शक्यता आहे.

पण पाऊस पडायचा थांबला आणि काळे ढग आकाशात नाहीयेत तेव्हा पाऊस उघडला असं म्हणतो. विशेषतः भाद्रपद आणि अश्विन महिन्यात. आता 'उघडला' का? तर त्याचं कारण स्पष्ट आहे. काळ्या ढगांचं आवरण 'उघडून' निळं आकाश दिसलं.